नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी  शरद पवारांची सातारच्या पत्रकारांसमवेत दिल्लीत भेट घेतली. उदयनराजेंचं तिकीट फायनल असल्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिले. माढा मतदार संघ शरद पवारांनी कदाचीत फायनल केल्यामुळेच उदयनराजेंना सातारामधून शरद पवारांनी ग्रिन सिग्नल दिला अशा सध्या चर्चा आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत असलेल्या 11 मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. यात विद्यमान 5 खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.
बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही तिकीट देण्यात येणार आहे. तर माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचं नाव निश्चित झालं आहे. तर नाशिकमधून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. समीर भुजबळ अलीकडेच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 2 वर्ष तुरुंगात होते. ते जामिनावर बाहेर आले आहे. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीने मित्रपक्षाला जागा सोडली आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours