मुंबई: भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.  प्रशांत किशोर यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेत्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांची 'आयपॅक' ही कंपनी शिवसेनेच्या प्रचाराची दिशा ठरविण्याची शक्यता आहे.
2019च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचं प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर यांच्या हाती दिलं जाण्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे ऐतिहासिक निवडणूक प्लॅनिंग असेल असं म्हणायला हरकत नाही.
भारताचा यशस्वी निवडणूक रणनीतीकार  
-  भाजपच्या 2014च्या ऐतिहासिक निवडणूकीच्या प्रचाराची दिशा ठरवविण्याचं काम.
- जनतेचं मन जिंकणारं निवडणुक कॅम्पेन डिझाईन
- चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन आणि सोशल मीडिया कार्यक्रमांचं नियोजन
- नितीशकुमार यांच्यासाठी 2015च्या बिहार विधानसभा निवडणूकीचं कॅम्पेन
-- 'नितीश के निश्चय, विकास की गॅरेंटी' स्लोगनसह सायकलवरून कॅम्पेन
- 2017 - पंजाब विधानसभा निवडणूक कॅम्पेन
- 2017 - उत्तर प्रदेश विधानसभा  निवडणूक कॅम्पेन

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours