मुंबई, 08 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण प्रश्नांवर भाजप, आरएसएस आणि विहिंपवर ठाकरी बाण सोडलेत. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर निर्माणाचा प्रश्नं भाजपची सत्ता रोखणारा ठरू शकतो. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंमसेवक आणि विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिराचं बघू असं उत्तर म्हणजे राम मंदिर पुन्हा कुलूपबंद करण्यासारखचं आहे अशी टीका भाजपवर केली आहे.

राम मंदिरासाठी ज्यांनी शरयू नदीत बलिदान दिलं त्यांचं बलिदान नाकरण्यासारखचं भाजप, आरएसएस आणि विहींपची भूमिका असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.

सामना अग्रलेख

'विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे.'

'केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने नेमकी हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. 2019 च्या निवडणुकीत राममंदिर हा अडचणीचा मुद्दा मोदी परिवारासाठी ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार?'

'एकंदरीत प्रभू श्रीरामांचा वनवास संपायची लक्षणे दिसत नाहीत. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours