मुंबई: पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवुड देखील रस्त्यावर उतरलं असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये दुपारी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले होते. यावेळी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून (FWICE) पुलवामा हल्ल्याचा निषेध केला गेला. यावेळी पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवुडमध्ये स्थान दिले जाणार नाही. शिवाय, त्यांची गाणी देखील रिलीज केली जाणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली. दोन तासासाठी काम बंद ठेवत सिनेकलाकारांनी काळा दिवस पाळला.
तसेच माजी क्रिकेटर आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर देखील बंदी घालत असल्याची घोषणा FWICEनं केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी दहशतवादासाठी पाकिस्तान देशाला जबाबदार धरता येणार नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पाहायाला मिळत आहे. यानंतर सोनी वाहिनीनं देखील त्यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी केली आहे.
कंगनाचा शबाना- जावेद अख्तर यांच्यावर निशाणा
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचा पाकमधील कार्यक्रम रद्द करत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंगना राणौतनं हा सारा ढोंगापणा असल्याची टिका केली होती. त्यावरून शबाना आझमी यांनी देखील कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours