बेळगाव : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे संतप्त नागरिकांना महिलेचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तप पोलिसांनी या महिलेला अटकदेखील केली आहे.
बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली. त्यानंतर संतप्त जमावाने तिच्या घरावर दगडफेक करत घर पेटविण्याचा प्रयत्न केला.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच शिवापूर (ता. सौंदत्ती) येथील झिजायला ममदापुर नामक शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर व्हाट्सअॅपवर व्हायरल केला होता. त्यामुळे मुरगोड पोलिसांनी शनिवारी महिलेला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही माहिती समजताच संतप्त जमावाने त्या शिक्षिकेच्या घरावर दगडफेक करत घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर यरगट्टी रोडवरही रस्ता रोको करून निदर्शने केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours