मुंबई, 18 फेब्रुवारी : शिवसेना-भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार आहेत. यावेळी ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतीम शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परीषदेत शिवसेनेकडून त्यांच्या अटी आणि शर्ती सविस्तर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे. 

युतीसाठी काय आहेत शिवसेनेच्या अटी?

१) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ पैकी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर उमेदवार उभे करणार.

२) विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी शिवसेना १४४ आणि भाजप १४४ असा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला असणार.

३) शिवसेनेनं ही युती फक्तं भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही. 

४) त्यामुळे भाजपच्या १४४ जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान २० जागा सोडाव्या लागतील.

५) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.

६) त्यामुळे विधानसभेत शिवसेना १६४ पर्यंत उमेदवार उभे करू शकते.

७) युतीतील जागावाटपां बरोबरच राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours