मुंबई : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. 24 फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रासपचा हा मेळावा मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन सत्ताधारी भाजपकडून देण्यात आलं होतं. पण आता पुन्हा निवडणुका आल्या तरीही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारला धनगर समाजाच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.
धनगर समाजाचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रासपच्या मेळाव्यातच आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
धनगर आरक्षणाचा तिढा
काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. 'धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,' असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours