सोलापूर : महाराष्ट्र लोकसभा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-2018चा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 136 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुलने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर ओबीसी प्रवर्गातील प्रथम आलेला महेश जमदाडेदेखील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा आहे.
त्यामुळे खुल्या प्रवर्गातील प्रथम क्रमांक आणि ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांकावर सोलापूरने मोहर लावली असं म्हणायला हरकत नाही. या परिक्षेमध्ये महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील स्वाती किसन दाभाडे ही महिला राज्यात पहिली आली आहे.
राज्य सेवा परीक्षा एप्रिल 2018मध्ये मुंबईसह अन्य राज्यांमध्ये घेण्यात आली होती. एकूण 37 जिल्हाकेंद्रावर या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेसाठी एकूण 196695 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. सदर परिक्षेमधून राज्य सेवा परीक्षेकरता 2381 उमेदवार अर्हताप्रात्प ठरले होते.
ही मुख्य परीक्षा 2018 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे इथे घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 426 उमेदवार अर्हताप्रात्प ठरले.
Post A Comment:
0 comments so far,add yours