रायगड, 03 फेब्रुवारी : शिरगाव सरपंच सचिन ओझर्डे यांस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ही घटना आहे. या प्रकरणाची रायगडमध्ये एकच चर्चा आहे.
सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार पुत्र विकास गोगावले, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडीक यांच्याविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, पोलीस चौकशीत आमचा मारहाणीचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं आहे.
ते झालं असं की, शिनसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतच्या बातमीचे कात्रण फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी महाड शिवसेना आणि शिरगाव सरपंच सचिन ओझर्डे यांच्यामध्ये वाद सुरू होता. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दखल न घेल्याने ओझर्डे यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री आमदार पुत्र विकास गोगावले, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडीक यांच्यासह सात जाणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १६ जानेवारी रोजी सदरचा प्रकार घडला.
ओझर्डे यांनी आपल्या फेसबुक पेजवर जिवाला धोका असल्याबाबत पोस्ट टाकल्यानंतर सदर प्रकरणाचा खुलासा झाला. तेव्हापासून हे प्रकरण महाडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाडच्या राजकारणात खळबळ उडली आहे.
या प्रकरणी चुकीची माहिती समोर आली असून ओझर्डे यांच्यासोबत वाद नसल्याचा खुलासा आमदार भरत गोगावले आणि त्यांचा पुत्र विकास यांनी केला आहे.  पण स्वर्गीय बाळासाहेबांविरोधात अपशब्द ऐकून घेणार नाही असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. शिवसेना आणि ओझर्डे यांच्या वादानंतर ओझर्डे यांच्या कुटूंबीय तणावाखाली असून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours