सोलापूर: पंढरपूर-सोलापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झाले असून 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. अपघातात ठार झालेले सर्वजण मुंबईचे रहिवासी असल्याची माहती आहे.
पंढरपूर-सोलापूर रोडवर वेगानं जाणाऱ्या मारुती कारनं समोरून एसटीला धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की अर्ध्याहून अधिक मारुती कार बसमध्ये घुसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहानगी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली होती. देगावच्या हद्दीत एक मारुती इको कार बसवर आदळली. या कारला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा वापर करावा लागला.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्रचंड गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर काही वेळ लोटला तरीही वाहतूक पूर्ववत होऊ शकली नव्हती.
Post A Comment:
0 comments so far,add yours