मुंबई, 03 फेब्रुवारी : सध्याची तरुणाई कसला हट्ट धरले आणि त्यासाठी काय टोकाचं पाऊल उचलेल याचा नेम नाही. याचं धक्कादायक उदाहरण मुंबईच्या कुर्लातून समोर आलं आहे. कुर्ला परिसरामध्ये महागडा मोबाईल घेऊन दिला नाही या कारणामुळे एका 18 वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नदीम शेख असं या तरुणाचं नाव आहे. काल सकाळी 4 च्या सुमारास त्यानं किचनमध्ये ओढणीचा फास घेत आत्महत्या केली. नदीमला ऑनलाईन पबजी खेळाचं व्यसन लागलं होतं आणि त्यासाठी त्याला जास्त स्टोरेज असणारा असा 37 हजारांचा महागडा फोन हवा होता.
नवीन फोन हवा यासाठी त्याने घरी पैशांची मागणी केली. त्यावर त्याच्या भावानं त्याला फोनसाठी 20 हजार दिले होते मात्र त्याची महागड्या मोबाईलची इर्श्या पूर्ण न झाल्यानं, त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.
खरंतर, आधी लोकांचे अपघाती मृत्यू होत होते. पण आता चक्क जीवघेण्या गेम्समुळे आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांआधी व्हेल गेम खेळत अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. आता त्याच प्रकारचा पबजी गेम आला आहे. ज्याच्या नादापाई तरुण आत्महत्या करत आहेत.
कुर्ला स्थानक पूर्वेला असलेल्या वर्षा आदर्श सोसायटीत नदीम आपल्या आई भाऊ नईम, वहिनी आणि बहिणीसोबत राहत होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो पबजी गेम खेळत होता. रात्री 2 वाजता त्याला भाई नईम याने खेळ बंद करून झोपण्यास सांगितलं. त्यानंतर मात्र त्याचं शव पंख्याला लटकलेलं त्याच्या बहिनेने सकाळी बघितलं. यानंतर त्याच्या भावाने नेहरूनगर पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णलयात तो शवविच्छेदनासाठी पाठवून त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण नदीम याने खरंच पबजी गेम खेळण्यावरून आत्महत्या केली का? याचाही आता नेहरूनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम अधिक तपास करत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours