रिपोर्टर.. परदेशी
मौजा मासळ ऐतिहासिक शंकर पटाच्या निमित्ताने ट्रॅक्टर शर्यतीचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.  

                    येथे गेल्या कित्येक वर्षांपासून इनामी शंकर पटाचा वारसा मासळ गावाला मिळाला आहे. परंतु गेल्या तिन वर्षा पासून बैलांच्या शंकर पटावर बंदी आली आणि शंकर पटाचे हौसे - नवसे यांचे पदरी निराशेचे वातावरण निर्माण झाले. जेव्हा मासळ येथे पट असायची तेव्हा सभोवतालच्या २० गावा मध्ये पाहुण्यांची रेलचेल असायची. या पटाची येवढी ख्याती होती की, अमरावती - यवतमाळ पासुनचे लोक पट बघण्या करिता यायचे.         
   आता देशाच्या विविध भागात कार रेस, घोड्यांची रेस, जल्ल्कट्ठु, विविध रेस चालु असल्याचे निदर्शनास येते परंतु नेमके बैलांच्या शंकर पटानींच काय अडचण होत आहे. हे न समजण्या सारखं आहे,ही पट बंदी असल्याने जो शेतकर्यांच्या एक आनंदाचा सण असायचा तो सण होत नसल्याने शेतकरी निराश झाल्याचे चित्र दिसत आहे. असे मत मासळ येथील शंकर पटाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्या उद्घाघाटनीय भाषणातुन माजी जि. प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर बोलत होते.          
 या उद्घाघाटनीय कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत तालुका काँग्रेस कमेटि अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, बाजार समिती सभापती सुभाष राऊत, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बालु चुन्ने,इंजी. सुरेश ब्राम्हणकर, जि. प. सदस्य शुध्दमताताई नंदागवली, संतोष शिवणकर, देविदास राऊत, सरपंच उत्तम भागडकर, सरपंचा सविता लेदे, सरपंचा वर्षा कोरे, सरपंच सुमंता रामटेके, ऋषी फुंडे, उपसरपंच रुपेश पिल्लेवान, येशुका ब्राम्हणकर, ग्रा.प.सदस्या मंगला चुटे व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डुलीचंद चुटे सर यांनी तर प्रास्ताविक लालप्रसाद गोंडाणे व आभार छगण गोंडाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भय्या मते,लहानु गजघाटे, पुरुषोत्तम मेंढे, शालीक कठाणे, रतीराम मेंढे, युवराज हेमणे, महेंद्र लेदे, मंगेश दोनोडे, कल्पेश मते, संदीप थेर, विलास मलोडे, ब्रिजलाल मेंढे व युवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours