दि 27 मार्च 2019.
ब्रम्हपुरी ;-- ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा रामपुरी (मेंडकी) येथील जानकीराम शंकर भलावी वय 50 वर्ष हा पुरुष नेहमी प्रमाणे आपल्या सौ अनुषया या पत्नी सोबत सकाळीच रामपुरी पासून 2 किलो मीटर  रामपुरी एकारा या जंगलात मोहफुल गोळा करायला गेला असता सकाळी 7.30 च्या दरम्यान दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार करून अर्धा किलो मीटर अंतरावर ओढत नेऊन एकारा अंतर्गत अर्जुनी बीटात नेऊन त्याच्या मानेचे लचके तोडत संपूर्ण निर्वस्त्र केला .त्यावेळी काही अंतरावर त्याची पत्नी मोहफुल गोळा करीत होती ,ती जेव्हा आपल्या पतीला हाक दिली तेव्हा त्यांचा बोलण्याचा आवाज येत नाही म्हणून बघितली तेव्हा त्यांच्या चपला अस्त व्यस्त पडलेल्या दिसल्या व ओढत नेल्याचे खुणा दिसल्या त्या नंतर तिने आरडा ओरड करून ईतर मोहफुल गोळा करणाऱ्या लोकांकडे धाव घेतली व त्यांच्या साहयाने शोध घेतला असता त्यांचा मृत्यूदेह एकारा अंतर्गत अर्जुनी बीटात दिसून आला .
त्यामुळे रामपूरी एकारा व इतर परिसरात लोकांन मध्ये दहशत निर्माण झाली असून ,मोहफुल गोळा करून आपला उदर निर्वाह करणाऱ्या मजूर लोकांन वर याचा फार मोठा परिणाम झाला व यापुढे शेतात कसे जायचं हाही प्रश्न निर्माण झाला असून ,लोकांन मध्ये वनविभाग व शासना प्रति तीव्र असंतोष निर्माण झाला आहे यापूर्वी सुद्धा काही दिवसा पूर्वीच पद्मापुर,हळधा,बोडदा, आवळगाव,चिचगाव,मुरपार,गोगाव, सायगाव या परिसरात अनेक लोकांचे वाघाच्या हल्ल्यात बळी गेले आहेत म्हणून किसान सभेचे नेते कॉ विनोद झोडगे यांनी या भागातील नरभक्षक वाघ व वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा या मागणीला घेऊन काही दिवसांपूर्वी मा सुधीर मुनगंटीवार वनमंत्री यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा होता व वाघाच्या सातत्याने घडत असलेल्या घटनेकडे लक्ष वेधले होते व त्या अनुषंगाने मा मुनगंटीवार यांनी समुर्ण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक किसान सभेच्या पदाधिकारी सोबत दि 1 मार्च 2019 ला मुंबई मंत्रालयात बोलावली होती व त्या मध्ये या परिसरातील  नरभक्षक वाघांना पकडून इतरत्र हलविण्याचा निर्णय झाला होता परंतु पद्मापुर येथील एक वाघ पकडून ईतर नरभक्षक वाघांन कडे दुर्लक्ष केल्याने काही दिवस उलटत नाही तर ही घटना घडल्याने वनविभाग प्रति जनते मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
रामपुरी येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मेंडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा खेडीकर,वनविभागाचे मा गरमळे,सूर्यवंशी,राऊत यांनी भेट घेऊन वनविभाग द्वारे त्वरित आर्थिक मदत देण्याचे मान्य केले यावेळी गावातील व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours