मुंबई : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित
उमेदवारी यादी धूलिवंदनाच्या मुहूर्तावर जाहीर झाली.एकूण 20 राज्यांतले 182
उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या 16
उमेदवारांची नावं आहेत. मुंबईतल्या सहा मतदासंघापैकी दोनच जागांवरचे
उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या जागांचा पेच
अजून कायम आहे आणि चर्चा सुरू राहणार अशीच चिन्हं आहेत. ईशान्य मुंबईतून
विद्यमान खासदार किरीट सोमय्या उत्सुक आहेत. पण त्यांच्या नावाला युतीतल्या
शिवसेनेकडून विरोध असल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर संजय
दीना पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण भाजपच्या पहिल्या यादीत
ईशान्स मुंबईचा उमेदवार जाहीर झालेला नसल्याने ही लढत स्पष्ट झालेली नाही.
मुंबईतल्या
एकूण 6 लोकसभा मतदारसंघांपैकी युतीच्या गणितानुसार 3 जागा भाजपकडे तर 3
शिवसेनेकडे येतात. भाजपच्या कोट्यातल्या 3 पैकी 2 जागांवरचे उमेदवार
पहिल्याच यादीत स्पष्ट झाले आहेत. त्यापैकी मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी
आणि उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी
देण्यात आली आहे. ईशान्य मुंबईतले खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी
मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली ते
बहुतेक सगळे विद्यमान खासदारच आहेत. नगरची जागा सुजय विखे पाटील यांना आणि
लातूरची सुधाकर भालेराव शृंगारे यांना जाहीर करण्यात आली आहे. हे दोन
उमेदवार सोडता बाकी सगळे 2004 चे विजयी खासदारच भाजपने पुन्हा उमेदवार
म्हणून दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित
शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुभाष भांबरे यांच्यासह बहुतांश
विद्यमान खासदारांची नावं या यादीत आहेत. मोदी स्वतः वाराणसीतून तर शहा
गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवानी यांचा पत्ता पक्षाने कट केल्याचं उघड झालं आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours