लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने आज 182 उमेदवारांची यादी जाहीर झाली
आहे. महाराष्ट्रातून एकूण 16 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूरमधून
नितीन गडकरी, बीडमधून प्रीतम मुंडे, धुळ्यातून सुभाष भामरे, रावेरमधून
रक्षा खडसे या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे.
अहमदनगरमधून सुजय विखे पाटील आणि लातूरमधून सुधाकरराव भालेराव-शृंगारे
यांना तिकीट देण्यात आले आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे
समजले जाणारे रामदास तडस यांना वर्ध्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राची 16 जणांची यादी
नागपूर - नितीन गडकरी
धुळे- डॉ सुभाष भामरे
वर्धा - रामदास तडस
नंदूरबार - हिना गावित
रावेर - रक्षा खडसे
अकोला - संजय धोत्रे
गडचिरोली - अशोक महादेवराव नेते
चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर
जालना - रावसाहेब दानवे
भिवंडी - कपील पाटील
मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - डाॅ. प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव भालेराव - शृगांरे
सांगली - संजयकाका पाटील



Post A Comment:
0 comments so far,add yours