सोलापूर 1 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवतो म्हणून. पण प्रवेश करणारे हे काही लहान मुलं नाहीत. अनेक मोठे नेते प्रवेश करताहेत. उदयनराजे, धनंजय महाडीक हे भाजपमध्ये प्रवेश करताहेत, करणार आहेत ही सगळी मंडळी समजदार आहेत. ते का असा निर्णय घेत आहेत याचा त्यांनीच विचार करावा असा टोही त्यांनी लगावला.
या सभेत काँग्रेसचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीतसिंह पाटिल आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते 7 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून दिवसभरात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादला त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदींच्या दौऱ्याकडे लागलं आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे विरोधीपक्षांवरचा दबावही आणखी वाढलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours