मुंबई, 22 मार्च : सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र पाटील आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
नरेंद्र पाटील हे भाजपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता होती. पण युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला ही जागा मिळाल्याने नरेंद्र पाटील आता धनुष्यबाण हाती घेणार आहेत. लवकरच ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश करतील, अशी माहिती आहे.
कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. ते जर उदयनराजेंविरोधात उभे राहिले तर सातारा मतदारसंघात चांगली लढत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कारण शिवसेना-भाजप युतीची ताकद आणि माथाडी कामगार नेते अशी ओळख यामुळे नरेंद्र पाटील उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण करू शकतात.
उदयनराजे आणि राष्ट्रवादीतील धुसपूस
राष्ट्रवादी काँग्रेसने उदनराजे यांना उमेदवारी घोषित केली आहे. पण उदयनराजेंचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत असलेल मतभेद सातत्याने समोर आले आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours