पुणे, 22 मार्च : पुण्यातील भाजप समर्थक राज्यसभा
खासदार संजय काकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ही भेट होणार आहे. दरम्यान, संजय काकडे यांनी
पत्नीसाठी लोकसभेची उमेदवारी मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाराज
संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेतल्यानंतर संजय काकडे आपल्या निर्णयावर ठाम राहणार का? हे
पाहावं लागणार आहे.
देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका
होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे 2019मध्ये मतदार राजा
कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर
आता पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. लोकसभेसाठी शिवसेना आणि
भाजपनं युती केली आहे. तर, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील
लोकसभेसाठी आघाडी केली आहे. शिवाय, राज्यात वंचित बहुजन आघाडी देखील
निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे रंगतदार होणाऱ्या या निवडणुकीत
कोण बाजी मारणार? हे पाहावं लागणार आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours