सोलापूर, 24 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'मोदींचे परराष्ट्र धोरण संपूर्णपणे फेल गेलेले असून रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली आहे,' असं म्हणत सुजात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
'भाजपसुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे दबावाखाली आहे. आम्ही कुणाच्या दबावाखाली असण्याचा प्रश्नच येत नाही असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 
'प्रकाश आंबेडकर सोलापुरातूनच'
'प्रकाश आंबेडकर हे सोलापूर मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. अकोल्यात मात्र माझी आई निवडणूक लढवणार नाही,' असा खुलासा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
'माझ्याकडे सिक्रेट फॉर्म्युला'
'बहुजन वंचित आघाडीच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी माझ्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युले आहेत. जे मी जाहीर करणार नाही,' असंही सुजात आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours