सोलापूर, 29 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना अखेर निवडणूक चिन्ह मिळालं आहे. आंबेडकर हे सोलापूरमधून आघाडीचे उमेदवार आहेत. आयोगाने त्यांना 'कप बशी' हे चिन्ह दिलंय. निवडणूक लढताना निवडणूक चिन्हाचं मोठं महत्त्व असतं. सोलापूरप्रमाणेच आंबेडकर हे विदर्भातल्या अकोल्यातूनही निवडणूक लढवत आहेत.
आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. त्यांना त्यांचं स्वतंत्र निवडणुक चिन्ह नाही. त्यांना आयोगाकडे अर्ज करून चिन्ह घ्यावी लागतात. त्यात आंबेडकरांना 'कप बशी' हे चिन्ह मिळाल्याने आता ते त्याचा प्रचार करणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कप बशी चिन्हाची मोठी क्रेझ असल्याचं अनेकदा आढळून आलं आहे.
आंबेडकर का लढताहेत दोन जागेंवरून
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि विदर्भातल्या अकोल्यातून निवडणूक लढविणार आहेत. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूरच्या सभेत सुरुवात
वंचित बहुजन आघाडीची सुरूवात पंढपूरमध्ये झालेल्या सभेत झाली होती. नंतर सोलापूरमध्ये झालेल्या प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींच्या सभेचा प्रचंड गर्दी झाली होती. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरातून लढण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours