सांगली, 29 मार्च : आघाडीतला सांगलीच्या जागेचा तिढाही अजूनही कायम आहे. काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यास राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर पाटलांची मुलगी स्मिता पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे, सांगलीच्या जागेचा आग्रह धरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही स्मिता पाटील यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. स्मिता पाटीलनं स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह स्वाभिमानीनं धरला आहे. मात्र स्मिता पाटील यांनी वडिलांच्याच अर्थात राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.
दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक गड ढासळले. सांगली लोकसभा मतदासंघही याला अपवाद नव्हता. संजय काका पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करून भाजपने काँग्रेसला आस्मान दाखवलं. त्यामुळे भाजपची पाळमुळं या मतदारसंघात रोवायला मदत झाली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours