पुणे, 29 मार्च : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का, याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
प्रवीण गायकवाड हे काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून लढतील हे चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. पण निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे वैतागून अखेर आपण उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचं गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं होतं.
पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेलेला नाही. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आलं. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यताही समोर आली आहे. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours