मावळ, 30 मार्च : माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली. सध्या पार्थ पवार देखील जोरात प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार विरूद्ध शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे असा सामना आता मावळमध्ये रंगणार आहे. पण, मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारणातील 'मुळशी पॅटर्न'ची चर्चा सुरू आहे. शिवाय, तो पाहायाला देखील मिळत आहे.
या मतदारसंघातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला भाजप कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे मुळशीमधील शिवसैनिकांनी बारामतीतील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं आहे. बारामतीतून कांचन कुल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours