मुंबई: लोकसभेच्या 2019 च्या निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भूमिकेचा खुलासा केला. मला कधीच लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती. देश सध्या एका संकटातून जातोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट असून ते दूर झालं पाहिजे यासाठीच प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ही निवडणूक कुठल्या पक्षांची नाही तर मोदी,शहांविरूद्ध आहे असंही ते म्हणाले. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी आणि शहांच्या विरूद्ध काम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.

कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करावा. त्याचा ज्या पक्षांना फायदा व्हायचा त्यांना होऊ द्या. मोदी आणि शहा राजकीय पटलावरून दूर गेल्याशिवाय राजकारणाचं भलं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आपण पाहिला नाही असंही ते म्हणाले.

राज ठाकरे हे बारामतीची स्क्रिप्ट वाचतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान मोदींनी पवारांची जी स्तुती केली होती त्याच्या काही व्हिडीओ क्लिप ऐकवल्या. आता मुख्यमंत्री उत्तर देतील का? असा सवालही त्यांनी केला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours