मागच्या आठवड्यात 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुरडीवर तिच्याच 3 भावांनी आणि काकाने सामूहिक बलात्कार केला होता. या धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातला आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर भावांनी आणि काकाने चिमुरडीचं शिर धडापासून वेगळं केलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात 3 भाऊ आणि एका काकाला ताब्यात घेतलं आहे. या तिघांनीही त्यांच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा सगळ्यात मोठा भाऊ हा 22 वर्षांचा आहे. त्यादिवशी हा प्रकार झाला तेव्हा त्याने पीडित मुलीला शाळेत न पाठवता आपल्या काकाच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 40 वर्षीय काकानेही तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पीडितेवर अप्राकृतिक कृत्य केल्याचं ऑटोप्सी रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours