सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी लोक त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असं म्हंटलं जातं. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘घाडगे & सून’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’, ‘नवरा असावा तर असा’ आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमीचे विशेष भाग या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

घाडगे & सून मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयसमोर आले असून तो हे सत्य घरच्यांना सांगू शकत नाही. याच कारणामुळे त्याच्या वागण्यामध्ये झालेला बदल,चिडचिड ही अमृता, माई आणि घरातील इतरांना दिसून येते आहे. या आठवड्यामध्ये होळीच्या दिवशी कियारीचं हे सत्य अमृतासमोर येणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours