मुंबई : स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग म्हणजे, जणू मृत्यूला आमंत्रण. गेल्या काही वर्षात या आजाराने अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू म्हटले तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. अशा आजारातून मुंबईतील एक रुग्ण बरा झाला. पण  राहुल लोधा या रुग्णाचे नाव  होय. पण साक्षात मृत्यूच्या दारात जाऊन आलेला राहुल आता जगण्याची लढाई लढत आहे. मुंबई जवळच्या भाईंदर उपनगरात राहणाऱ्या राहुलला स्वाईन फ्लूची लागण झाली. जानेवारीमध्ये स्वाईन फ्लूचे निदान झाल्यानंतर राहूलला जसलोक हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. तेव्हा त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. डॉक्टरांनी त्याला 5-6 दिवस व्हेंटिलेटवर ठेवले होते. त्यानंतर राहुल बराही झाला, पण या आजारादरम्यान झालेल्या खर्चाने त्याला पुरते कर्जात बुडवले. राहुल एक दोन नव्हे तर तब्बल 60 दिवस व्हेंटिलेटरवर होता.  या सगळ्या उपचारासाठी राहुलला एक कोटी रुपयांचा खर्च आला.
डॉक्टरांच्या मते राहुलची ही केस फारचं दुर्मिळ होती. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या आधी त्याला न्यूमोनियाही झाला होता, त्यामुळे त्याच्या फुफ्फुसांवर याचा थेट परिणाम झाला, म्हणून त्याला पाच-सहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण राहुलच्या जिद्दीने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडला. यासंबंधीत वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात देण्यात आले होते.
तीन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, या आजारातून राहुल सुखरुप बाहेर पडला. पण या आजाराचा खर्च कोटींच्या घरात गेला. यासंदर्भात राहुलच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मदत निधी मागितला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना मुख्यमंत्री रिलीफ फंडकडून मदत घ्यावी असे सांगण्यात आले आणि जेव्हा राहुलचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांकडे गेले असता, तुम्ही मुळचे राजस्थानचे आहात असे सांगत, त्यांना मदत नाकारली. अखेर राहुलच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या खाजगी संस्थांकडून मदत मागितली.  यावर्षी मुंबईत 800हून अधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, महाराष्ट्रात 55हून अधिक रुग्णांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours