23 मार्च : भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी रात्री तिसरी यादी जाहीर केली. दरम्यान, पुरी या जागेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण, ओडिसातील पुरीमधून आता संबित पात्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 36 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये आंध्र प्रदेशातील 23, महाराष्ट्रातील 6, ओडिसामधील 5 आणि मेघालय आाणि आसाममधील प्रत्येकी एका जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आले. भाजपनं आत्तापर्यंत 220 उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.
याव्यतिरिक्त भाजपनं आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीकरता 21, ओडिसा विधानभेकरता 22 शिवाय मेघालयच्या सेलसेला पोटनिवडणुकीकरता देखील उमेदवार जाहीर केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours