24 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यातील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. एकूण 38 जणांची नाव जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त अशोक चव्हाण यांच्याच नावाची घोषणा झाली आहे. अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर झाल्यामुळे नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची थेट लढत पाहण्यास मिळणार आहे.
कर्नाटकमध्ये 18, मध्य प्रदेश 9, मनिपूर 2, उत्तराखंड 5 आणि उत्तर प्रदेशमधून 3 जागांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांच नाव समोर आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours