मुंबई शहर जिल्हयामध्ये सायन भागात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी तपासणी पथकाव्दारे 11 लाख 85 हजार संशयीत रक्कम पकडण्यात आली आहे. 17 एप्रिलला म्हणजे बुधवारी रात्रीच्या सुमारास सायन कोळीवाडा परिसरात विधानसभा मतदारसंघातील संजय नारायन वारंग यांच्या क्र. 3 या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पिटलजवळील सिग्नलवर पाहणी करत असताना ही रक्कम पकडली आहे. लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.47 ए.बी.6559)तपासणी केली असता गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह आणि अनुराग कुमार शाह हे तीन इसम होते. त्याच्याकडे 11 लाख 85 हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आलं असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours