अहमदनगर, 19 एप्रिल : '1977 साली आम्ही चूक केली. त्यामुळे आम्हाला जनतेने खाली खेचलं. नंतर दोनच वर्षांनी पुन्हा जनतेनं इंदिरा गांधी यांच्यावर विश्वास ठेवून एकहाती बहुमत दिलं.' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. या बरोबरच 'जनतेमुळे देशातील लोकशाही मजबूत असल्याचं सांगत नरेंद्र मोदीदेखील 1977 च्या इंदिरा सरकारप्रमाणे वागत आहेत' पवारांनी म्हटलं आहे.
दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कर्जत इथे सभा पार पडली. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात झालेल्या या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात आम्हाला संधी दिली आणि आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व पुढं आणलं पाहिजे असं सांगत संग्राम जगताप यांच्या उमेदवारीच समर्थन केलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours