अमरावती, 18 एप्रिल- लोकसभेसाठी गुरुवारी देशात दुस-या टप्प्यात मतदान झालं. अमरावती लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. परंतु अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी नदी प्रकल्पग्रस्त भातकुली तालुक्यातील गोफगव्हाण या गावातील 526 प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. गावकऱ्यांच्या एकतेपुढे निवडणूक विभागालाही हतबल व्हावं लागलं.
गोफगव्हान या गावातील प्रकल्पग्रस्तांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला. प्रकल्पग्रस्तांच्या यामध्ये जमिनी गेल्या. अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा या प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी निराशाच आल्याने या गावातील लोकांनी एकजूट होऊन अनेकदा शासनाला निवेदन पाठपुरावा केला. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. राजकीय नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
गोफगव्हाण या गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांनी निषेधाचे फलक लावले आहेत. मतदानाकडे पाठ फिरवली. एकाही मतदाराने  मतदान न केल्याने मतदान केंद्र ओस पडले होते. 6 वाजेपर्यंत एकही मतदान झाले नसल्याचे निवडणूक अधिकारी गजानन बिजवे यांनी सांगितले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours