मुंबई, 19 एप्रिल : मुंबईच्या विक्रोळी परिसरात शुक्रवारची मध्यरात्री धक्कादायक ठरली. भरधाव वेगात आलेला ट्रक उलटल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विक्रोळीच्या पार्क साईट पोलीस स्टेशन परिसरात ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असताना नाल्याचा कोपरा तुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये रोडवर असलेल्या 4 लोकांच्या अंगावर हा ट्रक पडला.
ट्रकखाली चिरडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या एकाला तात्काळ उपचारासाठी नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अश्विन हेवारे, विशाल शेलार, अब्दुल हमीद शेख, चंद्रशेखर मुसडे अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावं असून चांद हसन शेख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours