नवी दिल्ली, 05 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळमधील वायनाड येथून लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आयोगाच्या नियमानुसार त्यांनी संपत्तीसंदर्भात माहिती जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 69 टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांच्याकडे 15 कोटींची संपत्ती आहे. या संपत्तीपैकी दिल्लीतील महरौली येथे एका फार्म हाऊसचा देखील समावेश आहे. या संपत्तीत प्रियांका गांधी यांचा देखील वाटा आहे.
2014च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी त्यांची एकूण संपत्ती 9.4 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत पाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडील स्थिर मालमत्तेची किमत 2014मध्ये 1.32 कोटी होती. त्यात 2019मध्ये वाढ होत 10.8 कोटी झाली आहे. तर अस्थिर मालमत्तेत घट झाली आहे. 2014मध्ये  8.07 कोटी असलेली मालमत्ता 5.8 कोटी इतकी झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे रोख रक्कम म्हणू्न केवळ 40 हजार रुपये आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours