दौंड : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूकीत लोकांनी वगळा कौल दिला होता. लोकांना आता कळून चुकलंय. दौंडमध्ये गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालं होतं. त्यामुळे झाले गेले विसरून या निवडणुकीत आघाडीला साथ द्या असं आवाहन राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
त्या म्हणाल्या, आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत घोषणा दिल्या. मात्र त्यांच्या सत्तेचा पाच वर्षांचा काळ आणि त्यातील घडामोडी पाहता आता बहोत हुयी महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार असंच म्हणावं लागेल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. त्याचवेळी सुषमा स्वराज यांनी विरोधक म्हणून केलेल्या भाषणाचा दाखला देत त्या म्हणाल्या, बुलेट ट्रेननं देशाचं पोट भरणार नाही, पण लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यानं जर संप केला तर सर्वांचे वांदे होतील हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधलाय.
याचवेळी त्यांनी दौंडमध्ये मागील निवडणुकीत झालेल्या कमी मताधिक्याबद्दल झालं गेलं गंगेला व्हायलं, त्यावर चर्चा न करता आता साथ द्या अशी भावनिक साद मतदारांना घातलीय.
Post A Comment:
0 comments so far,add yours