बीड: बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्याआधी बीडच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचंही नाव चर्चेत होतं. त्यामुळे पंडित यांना डावलून बजरंग सोनवणेंना तिकीट दिल्याने पंडित समर्थकांमध्ये नाराजी होती. तसंच धनंजय मुंडे यांनी आपल्या मित्राचा विश्वासघात केल्याची चर्चाही सुरू झाली. पण या सगळ्या वादावर पडता टाकत मुंडे-पंडित आता पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

'बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सर्वात आधी भैय्यासाहेब अमरसिंह पंडित यांच्या नावाची सूचना मीच केली. जिल्हा परिषदेत आम्ही एकत्र निवडून आलो, तेव्हा पक्ष वेगळे असतील पण आमचा गहरा याराना होता. आजही आमच्या संबधांना वारासुद्धा छेदून जाऊ शकत नाही, तर हे कोण आहेत फुट पाडणारे?' असं ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी अमरसिंह पंडित यांच्याबरोबर आपली अजूनही चांगली मैत्री असल्याचं दाखवून दिलं आहे.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours