मुंबई: बाँबे हायकोर्टाने गर्भपातासंदर्भात बुधवारी एक ऐतिहासिक निकाल दिला. आईच्या जीवाला धोका असेल तर 20 आठवड्यांनंतर गर्भपात करायला कोर्टाची परवानगी मागायची आवश्यकता नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचना यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
भारतात 20 आठवड्यापेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही. गुन्हा नोंदवला जातो. गरोदरपणात नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण डॉक्टरांना हा निर्णय घेण्याअगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.
गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर गर्भात काही व्यंग असल्याचं लक्षात आलं आणि त्याचा आईच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होणार असं जाणवलं तर संमतीने गर्भपात करण्याचा अधिकार डॉक्टरांना आहे. त्यासाठी कोर्टात जायची गरज नाही, असा या निकालाचा अर्थ आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours