मुंबई, 17 एप्रिल : मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष कोणतीच कसर ठेवताना दिसत नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा मतदारसंघात येणाऱ्या अकलूजमध्ये जाहीर सभा होणार आहे. दुसरीकडे, आपल्या आक्रमक शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यांची आज सातारा इथं सभा होईल.
कुणाची कुठे होणार सभा?
- अकलूजला सकाळी 10 वा. नरेंद्र मोदी यांची सभा
- सातारा कोरेगाव इथं दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची सभा
- साताऱ्यात राज ठाकरे यांची संध्याकाळी सभा
- उद्धव ठाकरे यांची माणगावमधे सभा
- अमित शहा यांची 10 वा. तासगावमधे सभा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours