बारामती, 17 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पराभूत करू, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडूने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यावर मजबूत पकड आहे. ते स्वत: विधानसभेला याच मतदारसंघातून निवडून जात असतात. त्यामुळे लोकसभेला या तालुक्यातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य देण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज बारामती तालुक्यात अजित पवार तब्बल सहा सभा घेणार आहेत.
विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे निरावागज सांगवी, माळेगाव ,वडगाव निंबाळकर, करंजेपूल, सुपा या ठिकाणी सभा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
Post A Comment:
0 comments so far,add yours