कोल्हापूर, 22 एप्रिल : कोल्हापुरातील एचडीएफसी बँकेवर ऑनलाइन दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये हॅकर्सनी तब्बलव 67 लाख रुपये लंपास केले आहेत. या ऑनलाइन दरोड्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 
एचडीएफसी बँकेच्या कोल्हापूरमधील शाहूपुरी शाखेवर हा ऑनलाइन दरोडा पडला आहे. हॅकर्सने 67 लाखांची रक्कम लंपास केली आहे. हॅकिंगद्वारे एवढी मोठी रक्कम लंपास करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी समोर येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours