मुंबई,30 एप्रिल : गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे. रात्री उशिरा 2.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग विझवताना एक जवानदेखील जखमी झाला आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मजली असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'चं गोदाम येथे आहे. या आगीमध्ये धर्मा प्रोडक्शनच्या गोदामामधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे.  दरम्यान आग लागण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours