सोलापूर, 13 एप्रिल : बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात अंजली निंबाळकर यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे, तर इतर दोन जणदेखील जखमी झाले आहेत.
हा अपघात सोलापूरजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन अंजली यांच्यासह तिघेजण जखमी झाले. जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अंजली निंबाळकर या कर्नाटकचे विशेष पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. अंजली या खानापूरहून सोलापूर मार्गे नांदेडकडे आपल्या इनोव्हा गाडीने महाराष्ट्रचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचारासाठी निघाल्या होत्या.
Post A Comment:
0 comments so far,add yours