मुंबई, 12 एप्रिल : अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या अर्जुन कपूरशी असलेल्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे. मलाइका आणि अरबाज खान यांनी 2017मध्ये घटस्फोट घेतला. पण यावर जाहीरपणे बोलणं दोघांनीही वारंवार टाळलं. त्यामुळे मलाइका-अरबाजचा ब्रेकअप का झाला हा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होतो. नुकताच एका कार्यक्रमात अरबाज मलाइकाशी घटस्फोट घेण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर भावूक झालेला दिसला. अरबाज त्याचा मुलगा अरहानबाबत बोलताना म्हणाला त्यानं आम्हाला दोघांना वेगळं होताना पाहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी अरबाज दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन ज्यूनिअर प्लेअर लीग T20च्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित राहिला होता. यावेळी बोलताना अरबाज म्हणाला, 'मी नेहमी माझ्या मुलाबद्दल जागरूक असतो. माझा मुलगा 14 वर्षांचा आहे. त्यानं आपल्या आई-वडिलांना वेगळं होताना पाहिलं आहे. यावेळी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासोबतच त्याला मला चांगले संस्कारही द्यायचे आहेत.' अरबाज पुढे म्हणाला, माझं आणि मलाइकाचं नातं खीप चांगलं आहे. तिच्या कुंटुंबीयांशीही माझे चांगले संबंध आहेत. माझ्या मुलासाठी वेळ देऊन मी सर्व गोष्टींचं नियोजन करतो. त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours