मुंबई, 06 एप्रिल : मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये नेत्यांच्या संपत्तीवरून आरोप - प्रत्यारोप सुरू आहे. कोणत्या नेत्याची संपत्ती कशा रितीनं वाढली आणि किती पटीनं वाढली याबद्दल आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात श्रीमंत ठरलेल्या मुंबईतील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार पुनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये मात्र तब्बल 106 पटींनी घट झाली आहे.
विश्वास नाही ना बसत? पुनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांची 2014मध्ये 108 कोटी रुपयांची असलेली संपत्ती 2019मध्ये 2 कोटी 20 लाखांवर आली आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर, जमीन, सोने काहीही नसल्याचे महाजन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours