अहमदनगर : राधाकृष्ण विखेपाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे नगर जिल्हयातील काँग्रेसमधे चाललं तरी काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपुर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आलं नाही. सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटोदेखील बोर्डवर छापण्यात आला आहे. मात्र विखे पाटलांचा फोटो का डावलला असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

महत्वाची बाब म्हणजे श्रीरामपुर इथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरांत यांच्या हस्ते करण्यात आलं. काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात. मात्र कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे पाटील हे कांबळेपासून दुर आहेत. विखेंनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे विखे पुत्र सुजय विखे भाजपात गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours