9 एप्रिल : 'पाकिस्तानातल्या कारागृहात मृत्यू झालेल्या माझ्या पतीचा मृतदेह ताब्यात द्यावा', अशी मागणी गुजरातमधल्या एका मच्छिमाराच्या पत्नीनं केंद्र सरकारकडे केली आहे. या महिलेनं तिच्या पतीचं पार्थिव पाकिस्तानातून भारतात आणण्याची प्रक्रिया जलदगतीनं करण्यात यावी, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीचा गेल्या महिन्यात पाकिस्तानातील कारागृहात मृत्यू झाला. भिखाभाई बामनिया असं मृत्यू झालेल्या मच्छिमाराचं नाव आहे. पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्यानं त्यांच्या नौदलानं 15 नोव्हेंबर 2017रोजी मामनिया यांना ताब्यात घेतलं होतं.
बामनिया हे गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथील पालदी गावातील रहिवासी होते. त्यांच्या पत्नी भानीबेन यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या पतीचं 4 मार्चला पाकिस्तानच्या कारागृहात निधन झाल्याची माहिती मिळाली. त्याचं निधन होऊन आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. पण अद्यापपर्यंत पतीचं पार्थिव भारतात पाठवण्यात आलेलं नाही.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours