कोल्हापूर, 20 एप्रिल : कोल्हापुरात नवविवाहित तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पतीने घेतलेलं कर्ज माफ करण्याचे आमिष दाखवून एका तरुण सावकाराने नवविवाहितेवर बलात्कार केला. शुक्रवारी (19 एप्रिल) ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर सावकारासह त्याचे साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी सावकाराविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेनं केले गंभीर आरोप
साथीदाराच्या मदतीने सावकारानं अमानुष मारहाण करून शरीरावर सिगारेटचे चटके दिले, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

सावकारानं घेतला फायदा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पुण्यातील तरुणाशी वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातून विरोध असल्यानं दाम्पत्याने कोल्हापुरात एक खोली भाड्याने घेत संसार थाटला. घरखर्च चालवण्यासाठी दाम्पत्याला आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी पीडित महिलेच्या पतीने रूईकर कॉलनीतील सावकाराकडून 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले. पण कर्जाची परतफेड करताना या दोघांसमोर अडचणी निर्माण झाल्या.
याचाच फायदा घेत सावकारी कर्ज वसुलीच्या निमित्ताने दाम्पत्याच्या घरी वारंवार जाऊन त्यांना त्रास देऊ लागला. अशाच एका दिवशी महिलेचा पती घरात नसताना सावकार तेथे पोहोचला. खोटंनाटं काहीतरी कारण सांगत सावकारानं तिला कळंबा रोडवर आणले आणि तेथेच दारू पिऊन महिलेवर बलात्कार केला. झालेल्या प्रकाराबाबत सातत्यानं धमकी देत या नराधमानं तीन ते चारवेळा अत्याचार केल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. पण शुक्रवारच्या घटनेनंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours