मुंबई : लोकसभा निवडणूक मनसे लढवत नसली तरी मोदींचा खोडारडेपणा उघड करणार. असं म्हणत 'लाव रे तो व्हिडीओ' असा आदेश देत राज यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यभर राज ठाकरे सभा घेत असून त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला. पण, आता राज ठाकरे यांना निवडणूक आयोगानं धक्का दिला आहे.  राज यांच्या मुंबईतील सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. मुंबईतील या सभेवरून पालिका आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील टोलवाटोलवी केली जात आहे. पण, निवडणूक आयोगानं परवानगी दिली नाही तरी आम्ही सभा घेणार अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतली आहे. त्यामुळे राज यांच्या मुंबईतील सभेची उत्सुकता वाढली आहे.
नरेंद्र मोदी दहावी नापास, त्यांची डिग्री बोगस; प्रकाश आंबेडकरांनी केला प्रहार
काय म्हणालं निवडणूक आयोग?
24  एप्रिल रोजी मुंबईतील शिवडी येथे होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला अजून परवानगी मिळालेली नाही. मनसेचा उमेदवार उभा नसल्याने परवानगी देता येणार नाही असे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे महानगर पालिकाही परवानगी नाकारत आहे. शिवडीच्या नरे पार्क आणि भगतसिंग मैदानावर सभेसाठी मनसेनं परवानगी मागितली होती. यावेळी सारख्याच मैदानाकरिता अरविंद सावंत यांनी या मैदानाची मागणी केली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मात्र परवानगी दिली नसली तरी देखील आम्ही सभा घेणार अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.
राज यांचा घणाघात

मनसेनं लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र राज ठाकरे राज्यभर सभा घेत भाजपवर टीकास्त्र डागत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज यांच्या निशाण्यावर आहेत. जुने व्हिडीओ दाखवत, काही महिती दाखवत राज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपला राज्यात तरी त्याचे परिणाम भोगावे लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज यांच्या सभांचा झंझावता पाहता भाजप देखील हतबल झाल्याचं राजकीय निरिक्षक म्हणत आहे. शिवाय, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण, निवडणूक आयोगानं परवानगी नाकारल्यानंतर देखील मनसेनं मुंबईतील सभा होणार अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेणार? राज ठाकरे यांची मुंबईतील सभा होणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours