मुंबई : अभिनेत्री ट्विंकल सध्या लेखनाव्यतिरिक्त काही सिनेमांची निर्मिती करत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. राजकीय मुद्द्यांवर ती अनेकदा आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. काही वेळा यावरून वाद होतात तर काही वेळा तिचं कौतुकही होतं. संपूर्ण देशभरात निवडणुकीचं वातावरण असताना, ट्विंकलनं केलेलं एक ट्वीट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ट्विंकलनं नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला, जो पाहिल्यावर त्या फोटमधील व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी त्यात तिची मुलगी नितारा असल्याचा अंदाज लावला जात आहे. या मुलीनं चेहऱ्यावर अंडरविअर घातली असून ट्विंकलनं ती केजरीवालांची चाहती असल्याचं म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours