मुंबई, 28 एप्रिल : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत प्रत्येकजण अंदाज व्यक्त करताना दिसत आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे.
शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटलं आहे.
याच मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours